Advertisement

किती हा द्वेष? मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना नो इन्ट्रीची जाहिरात

या पोस्टनंतर अनेकांनी आपले मत यावर व्यक्त केलं आहे. अनेक मुस्लीम तरुण-तरुणींना असा अनुभव आला आहे.

किती हा द्वेष? मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना नो इन्ट्रीची जाहिरात
SHARES

मुंबईसंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक घर भाड्यानं देणं असल्याची जाहिरात आहे. मुंबईतील खारमध्ये हे घर १ लाख ४० हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

या जाहिरातीत घरमालकानं अनेक अटी दिल्या आहेत. त्या अटींमध्ये त्यानं लिहलेली एक अट मात्र संतापजनक आहे. यावर मुंबईकरांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

घर मालकानं लिहिलं आहे की, पेट्स म्हणजेच पाळीव प्राणी आणि मुस्लिमांना परवानगी नाही. पत्रकार राणा अयुब्ब यांनी ही पोस्ट सर्वांच्या दृष्टीस आणली. त्यांनी यासंदर्भातील स्क्रिनशॉट शेअर केला आहे. 

स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, हा मुंबईतील उच्चभ्रू भाग आहे आणि अशा प्रकारची जाहिरात करणं कितपत योग्य आहे.

या पोस्टनंतर अनेकांनी आपले मत यावर व्यक्त केलं आहे. अनेक मुस्लीम तरुण-तरुणींना असा अनुभव आला आहे. यातील एका व्यक्तीनं लिहिलं आहे की, आतापर्यंत अशा घटना केवळ मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये होत होत्या. आता नाशिकसारख्या भागात देखील अशा घटना घडत आहेत.

तर एकानं लिहलं आहे की, मी चेन्नईमध्ये घर शोधत होतो. त्यावेळी मला फक्त एकच प्रश्न विचारला जायचा की मी तुम्ही मुस्लिम आहात की नाही ते? असे अनुभव अनेकांनी शेअर केले आहेत. हेही वाचा

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

संबंधित विषय