Advertisement

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्या आता आणखी स्वस्त झाल्या आहेत. कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले आहेत.

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर
SHARES

राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्या आता आणखी स्वस्त झाल्या आहेत. कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले आहेत. आता प्रति चाचणी २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

खासगी प्रयोगशाळांना निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. ४५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.हेही वाचा -

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवरRead this story in English
संबंधित विषय