Advertisement

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं आता दिसून येत आहे. तसंच येथील रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे.

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं आता दिसून येत आहे. तसंच येथील रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण दुपटीचा कालावधी मागील सात दिवसांत ७७ वरून १३५ दिवसांवर गेला आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. येथील मृत्यूदरही कमी होत आहे. मृत्यूदर २.५६ टक्क्यांवरून २.५० टक्क्यांवर आला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४,७८९ वर गेली आहे. यामधील ४०,८६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १,१२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात १५ दिवसांपूर्वी रोज ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. तर आता रोज २०० ते २५० रुग्ण आढळत आहेत.

ठाणे पालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस होता. मात्र सप्टेंबर महिन्यात  तो ६० दिवसांवर आला होता. सात दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर आला होता. आता रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवस झाला आहे. 

रुग्ण संख्या कमी करण्यासाठी महापालिकेकडून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत शहरामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले होते.  याशिवाय परराज्यातून रेल्वे मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या प्रवाशांची स्थानकात शीघ्र प्रतिजन चाचणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.



हेही वाचा -

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा