नवी मुंबई : कुत्रीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

नवी मुंबईतील नेरुळ भागातून अटक केली. शंभूनाथ प्रधान असं आरोपीचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.

नवी मुंबई : कुत्रीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक
SHARES

पवई भागात नूरी या श्वानावर अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीस नवी मुंबईतील नेरुळ भागातून अटक केली. शंभूनाथ प्रधान असं आरोपीचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.

शनिवारी हिरानंदानी पोवईतील गॅलेरिया मॉलसमोर स्थानिकांना 'नूरी' जखमी अवस्थेत आढळली. तिच्या खासगी अंगातून रक्त बाहेर येत होतं. इतकंच नाही तर तिच्या खासगी भागात १२ इंच लांबीचे लाकूड घातलं गेलं होतं.

यानंतर काही प्राणीप्रेमींना याबाबत माहिती देण्यात आली. आणि त्यांच्या पुढाकारानं 'नूरी' ला अंधेरीतल्या प्राणी रुग्णालयात दाखल केलं. जिथं डॉक्टरांनी 'नूरी' ऑपरेशन केलं. डॉक्टरांनी सांगितलं की, नूरीच्या अनेक अंतर्गत अवयवांचं नुकसान झालं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांनी सीसीटीव्हीची मदत घेतली. ज्याच्या मदतीनं त्यांना आरोपीची ओळख पटली. पोलिसांना आरोपी नेरुळमध्ये राहतो अशी माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी रविवारी ३६ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यानं कुत्र्याला इजा केल्याबद्दल दिलगीर असल्याचं सांगितलं. प्रधान पवईच्या गॅलेरिया मॉलमधील मिष्टान्न दुकानात सफाई कामगार म्हणून काम करतो.

दुसरीकडे, नूरीची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, आवश्यक असल्यास तिला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी परळ येथील पशु रुग्णालयात नेले जाऊ शकतं.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय