सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या  निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे एनआयए कोर्टाने सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे.

 एनआयएच्या विशेष कोर्टाने ४ एप्रिलला सचिन वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. मिठी नदीतून सीसीटीव्ही डेटा मिळाल्यानंतर तपासाला वेग आला होता. शिवाय एनआयएला यांच्या पासपोर्टची चौकशी करायची होती. या कारणामुळे कोर्टाने कोठडीत वाढ केली होती. 

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.



हेही वाचा -

अनिल देशमुखांनी पवारांच्या मनधरणीसाठी मागितली खंडणी, आता सचिन वाझेंचा ‘लेटरबाॅम्ब’

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं
पुढील बातमी
इतर बातम्या