व्यापाऱ्याच्या घरी चोरीप्रकरणी नर्ससह तिच्या नवऱ्याला अटक

चेंबूर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी एका नर्ससह तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. या नर्सला व्यापाऱ्याने त्याच्या आईच्या देखभालीसाठी ठेवले होते. वयोवृद्ध आईचा विश्वास संपादन करून या नर्सने १५ लाखांचे मौल्यवान दागिने आणि 2 लाख रुपयांची रोकड चोरली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

आजारी वृद्धेच्या देखभालीसाठी

चेंबूर परिसरात राहणारे राज बिहारी (६६) हे मोठे व्यावसायिक आहेत. राहत असलेली संपूर्ण इमारतच बिहारी यांची आहे. त्यांची आई पुष्पा बिहारी यांना पर्किसन हा आजार आहे. त्यामुळेच वेळोवेळी त्यांंना विसरायला होते. तर वय झाल्यामुळे त्यांना चालताना ही त्रास होतो. त्यामुळे बिहारी यांनी त्यांच्या देखभालीसाठी २४ तास दोन नर्स ठेवल्या होत्या. त्यात आरोपी नर्स उमा महेश्वरी रामास्वामी (२५) ही आॅक्टोंबर २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत कार्यरत होती.

केरळमधून अटक

बिहारी यांच्याकडे कार्यरत असताना पुष्पा बिहारी यांचा विश्वास संपादन करत, तसंच त्यांच्या विसरभोळेपणाचा फायदा घेऊन घरातील १५ लाख रुपयांचे सोने आणि २ लाख रुपयेेेे घेऊन पळ काढला होता. चोरी केलेले सोने पतीच्या मदतीने विकण्यात आले होते. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी या दोघांना केरळमधील  ईडुक्की जिल्ह्यातील उमाच्या  मूळ गावातून अटक केली.


हेही वाचा -

आईनेच केली १६ दिवसांच्या मुलीची हत्या

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या