'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळ्ळ खट्याकमधून उत्तर देईल, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा
SHARES

विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळ्ळ् खट्याकमधून उत्तर देईल, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.


आचारसंहिता पायदळी

समाजातील तसंच चित्रपट क्षेत्रातील अनेक लोक या चित्रपटासाठी आपलं योगदान देत असल्याचा समज जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होत आहे. हा प्रचाराचा गलिच्छ प्रकार असून याचा आपण निषेध करत असल्याची प्रतिक्रिया मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळं त्याचं पालन होणं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच आचारसंहितेला पायदळी तुडवणार असेल तर हा प्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळ्-खटॅक करावं लागेल, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी दिला.


यापूर्वीही चित्रपटांसाठी निधी

अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन या दोन चित्रपटांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप शालिनी ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. आता त्या घटनेला एक वर्षही उलटत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा असा प्रकार भाजपावाल्यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.


‘त्यांच’ही नाव

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटातील गाणी जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिली असल्याचं चित्रपटाच्या पोस्टवर नमूद करण्यात आलंय. परंतु त्यांनी या चित्रपटात गीतलेखन केलं नसल्याचं त्यांनी जाहीररित्या म्हटलंही आहे. याचाही उल्लेख ठाकरे यांनी केला.




हेही वाचा - 

काँग्रेसच्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार; निरूपम मात्र प्रतिक्षेतच

‘अलिबागवरून आलायस का?’ म्हणण्यावर बंदी घाला; हायकोर्टात याचिका




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा