SHARE

सतत रडणाऱ्या मुलीच्या आवाजाने कंटाळून एका मातानेच आपल्या १६ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याची घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी समा नदीम अन्सारी (२५)  या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. रागातून हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. 


नाल्यात फेकलं

सायनच्या मदिना मस्जिदजवळ समा ही पती नदीमसोबत रहात होती. नदीम हा फर्निचर बनवण्याचे काम करतो. दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. १६ दिवसांपूर्वीच समाने एका मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे घरचे वातावरण आनंदी होते. गुरूवारी मुलगी वारंवार रडत होती. काही केल्या मुलगी रडायची थांबत नव्हती. त्यातच होणाऱ्या वेदनांमुळे समाचा पारा चांगलाच चढला होता. त्यावेळी राग अनावर झालेल्या समाने कंटाळून मुलीला घरामागील नाल्यात फेकून तिची हत्या केली. 


अपहरणाचा बनाव

काही वेळाने आपण केलेली चूक तिच्या लक्षात आल्यानंतर समाने मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. सर्वत्र शोधाशोध सुरु असताना मुलगी घरामागील नाल्यात सापडली. स्थानिकांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नदीमने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसाॆनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा अनोळखी व्यक्तीविरोधात नोंदवला.


रागातून कृत्य

पोलिस तपासात मुलीला झोपवून शौचालयासाठी आपण खाली आल्याची माहिती समाने पोलिसांना दिली. मात्र समा देत असलेल्या माहितीत तफावत आढळत असल्याने पोलिसांनी समाला फिरवून प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर एका क्षणाला समाचा बांध फुटला. त्यावेळी रडत रडत तिने मुलीच्या हत्येची कबूली दिली. रागातूनच हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.हेही वाचा - 

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

झाकीर नाईकच्या फायनांन्सरला मुंबईतून अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या