विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची २ फेब्रुवारी रोजी अज्ञातांनी हत्या केली होती. या हत्येचा उलघडा लावण्याच उत्तरप्रदेश पोलिसांना यशआले आहे. यातीलच एक आरोपी मुंबईत लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने त्याला बुधवारी अटक केली. 

 हेही वाचाः- माटुंगा स्थानकावर विकृताने घेतले विद्यार्थीनीचे चुंबन

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन हे सकाळी भावासोबत ६.३० वा. लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रासमवेत ग्लोब पार्कमध्ये ते फिरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी रणजीत बच्चन यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्यासोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले. तर डोक्यात गोळी लागल्यानं रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यु झाला होता. बच्चन यांच्या हत्येनंतर त्या ठिकाणचे CCTV फूटेज वायरल झाले. या फूटेजमधील व्यक्तीने मारेकऱ्यांना बच्चन येत असल्याचे खूनावले. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो वायरल करून त्याची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे. 

 

 

या हत्येनंतर पोलीस आयुक्त सुजित पांडे यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकं स्थापन केली होती. उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हे शाखा यांची सहा पथके आरोपींचा शोध घेत होती. यासंदर्भात संशयित आरोपींच्या सीसीटीव्ही फूटेजची पाहणी पोलिसांनी केली होती. अखेर पाच दिवसांनी पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे. बच्चन यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या एकाला अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी रेल्वेनं मुंबईत आला होता. मुंबई पोलीस आणि विशेष तपास पथकानं ही कारवाई केली. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करून त्याचा ताबा लखनौ पोलिसांकडे दिला जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

हेही वाचाः- कंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्द

 

पुढील बातमी
इतर बातम्या