Advertisement

कंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्द

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.

कंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्द
SHARES

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Indian Institute of Company Secretaries of India) या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. कंपनी सेक्रेटरी (Company Secretary)मधील 'फाऊंडेशन' परीक्षेचा (Foundation Exam) टप्पा काढून टाकण्यात येणार आहे. तसंच, या परीक्षऐवजी आता सीएस एक्झिक्युटिव्ह (CS Executive) देण्यास पात्र होण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळं आता उमेदवाराला प्रवेश परीक्षेमुळं ९ महिन्यांची वाट न पाहता पुढील परीक्षा देता येणार आहे.

कंपनी सेक्रेटरी (CS) च्या परीक्षेकरीता आतापर्यंत फाऊंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा ३ टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येत होती. यापैकी फाऊंडेशन हा टप्पा येत्या परीक्षेपासून रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेण्यात येणार आहे.

फाऊंडेशन परीक्षा १२वी झालेल्या विद्यार्थ्यांनाच द्यावी लागते. परंतु, आता पदवी, पदव्युत्तर अशी कोणतीही पात्रता असली तरी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढील परीक्षा देता येणार आहे. जानेवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर अशी वर्षांतून ४ वेळा ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. येत्या काळात १० मे रोजी ही परीक्षा होणार असून २० मे रोजी त्याचा निकाल (Results) जाहीर होणार आहे.

'अशी' होणार परीक्षा

  • फाऊंडेशन परीक्षेसाठी बिझिनेस एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड लॉ, बिझिनेस मॅनेजमेंट, एथिक्स अ‍ॅण्ड इंटरप्रन्युअरशिप, बिझिनेस इकॉनॉमिक्स, फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अ‍ॅण्ड ऑडिटिंग असे ४ विषय होते.
  • प्रवेश परीक्षेसाठी यातील अकाऊंटिंग अ‍ॅण्ड ऑडिटिंग हा विषय कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी तर्कशास्त्र (लॉजिकल रिझनिंग), ताज्या घडामोडी (करंट अफेअर्स) असे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • बिझिनेस कम्युनिकेशन, लीगल अ‍ॅप्टिट्यूड अ‍ॅण्ड लॉजिकल रिझनिंग, इकॉनॉमिक अ‍ॅण्ड बिझिनेस एन्व्हायर्नमेंट, करंट अफेअर्स, प्रेझेंटेशन्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन असे ४ विषय असणार आहेत.
  • या ४ विषयांमध्ये प्रत्येकी ४० गुण आणि एकत्रित ५० टक्के मिळालेले विद्यार्थी एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.
  • लेखी आणि तोंडी अशी दोन्ही स्वरूपात ही परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असून त्यासाठी २ तासांचा अवधी आहे.
  • तोंडी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ असणार आहे. तोंडी परीक्षेत दूरचित्रफीत व ध्वनिफितीवरून प्रश्न सोडवावे लागणार आहेत.



हेही वाचा -

माटुंगा स्थानकावर विकृताने घेतले विद्यार्थीनीचे चुंबन

मलबार हिल येथील इमारतीला भीषण आग, ८ जणांची सुखरूप सुटका



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा