मराठा मोर्चात खिसेकापूंचं फावलं!

मराठा समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी 9 ऑगस्टला मुंबईत काढलेला मोर्चा अभूतपूर्व असाच ठरला. लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शांततेल्या मार्गाने काढलेल्या या मोर्चामध्ये कोणतीही अनुचित घटना जरी घडली नसली, तरी खिसेकापूंचे मात्र या गर्दीत चांगलेच फावले!

एवढ्या मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होणं ही खिसेकापूंसाठी आयतीच संधी म्हणता येईल. बुधवारी निघालेला मोर्चाही त्याला अपवाद नव्हता. मराठा मोर्चादरम्यान तब्बल 37 मोबाईल आणि पाकीट चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. याशिवाय सोन्याच्या 10 चेनही चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. अजूनही पोलिसांकडे तक्रारी येत असून हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: मोर्चासारख्या ठिकाणी मोबाईल चोरांचा सुळसुळाट हा  असतोच. पण मराठा मोर्चादरम्यान आलेल्या लाखोंच्या समुदायाकडे बघता चोरीच्या तक्रारींचा हा आकडा कमीच असल्याचं मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.


हेही वाचा

मराठा समाजाच्या 'या' मागण्या मान्य

पुढील बातमी
इतर बातम्या