SHARE

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा समाजासाठी विविध घोषणा केल्या. त्यात कोपर्डी खटल्याच्या निकालापासून शिक्षणातील आरक्षणाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचे समाधान झालेले दिसत असले, तरी केवळ आश्वासन नको, तर लेखी हमी द्या, असे म्हणत काही मोर्चेकऱ्यांनी विधानभवनाच्या दिशेने कूच केली.


उदयन राजेही हवेत…

आझाद मैदानातील व्यासपीठावर मराठा समाजातील तरूणींचे भाषण झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी व्यासपीठावर जाऊन मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या पाठोपाठ मोर्चात सामील असलेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे व्यासपीठावर चढताच मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नितेश राणे यांना घेरत संभाजी राजे व्यासपीठावर आले, तर उदयन राजे का नाही? असे म्हणत उदयन राजेंच्या समर्थक मोर्चेकऱ्यांनी त्यांना रोखून धरले.


नितेश राणेंची गाडी रोखली

त्यानंतर गाडीत बसून निघालेल्या राणे यांची गाडीही मोर्चेकऱ्यांनी अडवली. त्यामुळे नितेश राणे अखेर मोर्चेकऱ्यांसोबत पायी विधानभवनाच्या दिशेने निघाले. मोठ्या संख्येने मोर्चेकरी आक्रमक होत विधानभवनाच्या दिशेने निघाल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. या फौजफाट्यालाही मोर्चेकरी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या