मराठा समाजाच्या 'या' मागण्या मान्य

Mumbai
मराठा समाजाच्या 'या' मागण्या मान्य
मराठा समाजाच्या 'या' मागण्या मान्य
See all
मुंबई  -  

मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा काढला. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मागे हटणार नाही आणि आझाद मैदानही सोडणार नाही असा निर्धार या मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. या मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजाने मोर्चाची सांगता केली.
कोणत्या मागण्या मान्य

 • मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा करणार
 • कोपर्डी बलात्कार प्रकरणी लवकरच निकाल 
 • मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फी सवलत मिळणार
 • प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलांसाठी वसतिगृह 
 • त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 5 कोटींची तरतूद
 • अॅट्रोसिटी कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती 
 • कौशल विकास योजनेतून 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण, नोकरी
 • ओबीसी प्रमाणेच मराठा समाजालाही सवलत मिळणार
 • मराठा विद्यार्थ्यांना 650 अभ्यासक्रमात सवलती
 • या सवलतीमुळे 10 लाख विद्यार्थ्यांना फायदा 
 • ईसीबीसाठी गुणांची अट 60 टक्क्यांहून 50 टक्केमराठा मोर्चावरून ट्विटरवही विविध प्रतिक्रिया उमटल्या. सामान्यांसह राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही ट्विटरवर आपले मत मांडले आहे. 


 


मोर्चेकऱ्यांमध्ये नाराजी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही मोर्चेकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. काही मोर्चेकऱ्यांनी थेट आमदार नितेश राणेंच्या गाडीसमोरच बैठक मारली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणेंची गाडी अडवून धरली. त्यामुळे अखेर नाईलाजाने नितेश राणेंना आंदोलकांसोबत पायीच विधानभवनाच्या दिशेने जावे लागले.हेही वाचा -  

मुंबईत मराठा मोर्चासाठी पोलिसांचा थ्री टायर बंदोबस्त!

पक्षांचे बॅनर फाडले, मोर्चात राजकारण्यांना 'नो एन्ट्री'Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.