मुंबईत मराठा मोर्चासाठी पोलिसांचा थ्री टायर बंदोबस्त!

 Mumbai
मुंबईत मराठा मोर्चासाठी पोलिसांचा थ्री टायर बंदोबस्त!
Mumbai  -  

राज्यात वर्षभरापासून सुरू असलेले मराठा वादळ अखेर मुंबईत धडकले आहे. या विराट मोर्चाला कोणतेही गालबोट लागू नये, याकरता मुंबई पोलिस दल सज्ज झाले असून, त्यांनी थ्री टायर बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई पोलिसांसह, राज्य राखीव दल, रेल्वे पोलिस बल, वाहतूक पोलिस, होमगार्ड आदींची पथके देखील तैनात आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज यावेळी या मोर्चात सहभागी होणार असल्याने या संपूर्ण मोर्चावर मुंबई पोलिस ड्रोनने नजर ठेवणार आहेत.


मराठा मोर्चाला 9 आॅगस्ट रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या एका वर्षात संपूर्ण राज्यात आतापर्यंत 57 विराट मूकमोर्चा काढण्यात आल्या असून या मोर्चाला अद्याप एकदाही गालबोट लागलेले नाही. त्यामुळेच यंदाही मुंबई शहरांत निघणाऱ्या मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित पकार घडू नये याकरता मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


20 हजार अधिकारी, कर्मचारी तैनात

यावेळी मुबई पोलिसांचे शिघ्र कृती दल, दंगल विरोधी पथक, बाॅम्बनाशक पथक, श्वानपथक आदी पथके देखील सज्ज झाली आहेत. यावेळी फक्त मोर्चासाठी जवळपास 20 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चा हा वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा निघणार असला तरी दहिसर, मुलुंड आणि मानखुर्द येथे देखील मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांचा बंदोबस्त आहे.

दरम्यान या मोर्चात सहभागी होणाऱ्या लाखो मराठयांच्या संख्येकडे बघता इथे मोबाईलची चोरी पाकीटमार नाकारता येत नाही. त्यामुळे मोर्चात साध्या वेशातील पोलिस देखील सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी जमणाऱ्या जनसमुदायाकडे बघता त्याला सुरक्षा देणे हे मुंबई पोलिसांना भागच असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी जय्यत तय्यारी मुंबई पोलिसांनी केली आहे.


हेही वाचा -

वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर


Loading Comments