वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर

Mumbai
वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर
वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर
See all
मुंबई  -  

मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ ऑगस्टला मुंबईत येऊन धडकणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी होणार असल्याने त्याचा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

भायखळा ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असून या वादळाच्या तडाख्यात अजाणतेपणे कुणीही सापडू नये, याची दक्षता घेण्याची सूचना मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने सर्वच वाहनचालकांना दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाला जीजामाता उद्यान, भायखळा येथून सकाळी ११ वाजता सुरूवात होईल. त्यानंतर हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून खडा पारसी पुतळा, नेसबिट जंक्शन, जे.जे. उड्डाणपूलमार्गे आझाद मैदान गाठेल. सायंकाळी ५ वाजता मोर्चाची सांगता होईल.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चेकरी मुंबईत येऊन दाखल होत असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यातच मुंबईतील वाहतूक यंत्रणेवर या मोर्चाचा ताण पडू नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनाच्या उद्देशाने सकाळी ९ वाजेपासूनच महत्त्वाचे बदल केले आहेत.
सविस्तर माहिती येथे घ्या -
मोर्चेकऱ्यांना येथे असेल पार्किंगची सुविधा :

 • सुमन नगर येथून आलेली वाहने भक्ती पार्कवरून, इर्स्टर्न एक्स्प्रेस मार्गाखालून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर पार्क करता येतील.
 • वाशी खाडी पुलावरून आलेल्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून डावे वळण घेऊन सुनम नगर जंक्शनवरून पोर्ट ट्रस्टला जाता येईल.
 • इर्स्टर्न एक्स्प्रेसवरून ठाण्याहून आलेल्या वाहनांना डावे वळण घेऊन सुमन नगर येथून पार्किंगचे ठिकाण गाठता येईल.
 • सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून पश्चिम उपनगरातून येणाऱ्या वाहनांना अमर महाल येथून डावे वळण घेऊन पार्किंगच्या ठिकाणी जाता येईल.


हे मार्ग राहतील बंद :

 • दादर फायर ब्रिगेड जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बंद राहील.
 • जे.जे. फ्लायओव्हर ते आझाद मैदान या मार्गावरुन दक्षिण आणि उत्तरेकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
 • हजारीमल सोमानी मार्गावरील ओएससी जंक्शन ते सीएसटी दरम्यान उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
 • मेट्रो जंक्शन ते पालिका मुख्यालयाकडे जाणारे मार्ग बंद राहतील.
 • भाटिया बागपासून सीएसटी जंक्शनला जाणारे मार्ग बंद राहतील.


या मार्गांवरून पर्यायी वाहतूक :

 • किंग्ज सर्कलपासून पी. डिमेलो मार्ग खुला राहील.
 • दादर टीटीपासून चाप रस्त्याचा वापर करता येईल.
 • नायगाव क्रॉसरोडपासून रफी अहमद किडवाई मार्गाचा वापर करता येईल.
 • मादाम कामा रोडपासून हुतात्मा चौक ते काला घोडा रस्ता खुला.
 • वरळी नाक्याला जाण्यासाठी ना. म. जोशी मार्गावरुन लोअर परळला जाता येईल.हे देखील वाचा -

मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...


 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.