मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा

Mumbai
मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा
मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा
मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा
मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा
मुंबईत मराठा समाजाचा निर्णायक महामोर्चा
See all
मुंबई  -  

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार करत या मोर्चात सामील झाले आहेत. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह महापालिका आणि अन्य यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

या मराठा मोर्चाला मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे.


मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईचे डबेवाले देखील मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना बुधवारी डबेवाल्यांची सेवा उपलब्ध होणार नाही. 

विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा 58 वा मूकमोर्चा आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. सकाळी 11 वाजता भायखळातील जिजामाता उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.

 

मराठा समाजातील छावा, अखिल भारतीय छावा, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या समन्वयकाची भूमिका बजावली आहे. आता शासनाचा निर्णय घेतल्याशिवाय मोर्चा मागे हटणार नाही आणि मैदानही सोडणार नाही असा निर्धार या मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने आतापर्यंत 57 मोर्चा काढल्या आहेत. 'बुधवारी विधानभवनाचे कामकाज बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चर्चा करावी', अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 289 च्या द्वारे स्थगन प्रस्ताव मांडून केली. मराठा आरक्षणासाठी विधानभवनाच्या बाहेर घोषणाबाजीही करण्यात आली. या मोर्चाला भाजपा नेते आणि आमदारांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
काय आहेत मागण्या?

 • कोपर्डीतील पीडितेला न्याय द्या
 • शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करा
 • मराठा समाजाला आरक्षण द्या
 • मराठा भवनसाठी प्रत्येक जिल्हात शासकीय जमीन द्या
 • 6 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती द्या
 • एस.सी आणि एस.टी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी सवलती द्या
 • महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस आराखडा तयार करा
 • मराठा समाजाची बदनामी थांबवण्यासाठी कठोर कायदा करा
हा महामूकमोर्चा शिस्तीत व्हावा यासाठी क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी नियोजन केले. वाहन पार्किंगपासून ते राज्यभरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोर्चात विनाअडथळा सहभागी होता यावे, यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहे.


मोर्चेकरांसाठीच्या सुविधा

 • पालिकेने पाण्याच्या 9 टँकर पुरवल्या  
 • एकूण 9 रुग्णवाहिकांची व्यवस्था 
 • आझाद मैदानात उपचार केंद्राची सुविधा


या मोर्चामध्ये ट्विटरवरही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. सिने अभिनेता रितेश देशमुख यानेही मराठा मोर्चाचा फोटा ट्विटरवर शेअर केला आहे.  मुंबईत मराठा मोर्चा अत्यंत शांततेने होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.