मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील गीतांजली जेम्स ही कंपनी बँका विक्रीला काढणार आहेत. मेहुलला कर्ज देणाऱ्या बहुतांश बँकांनी कर्ज परतवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली १८० दिवसांची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. 

कंपनी विकणार

गीतांजली जेम्सचे अधिकारी विजय कुमार गर्ग यांनी स्टॉक एक्स्चेंजला मंगळवारी याबाबत माहिती दिली. 'सीओसीनं कर्ज निराकरण प्रक्रियेसाठी दिलेली मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता कंपनी विकण्यात येणार आहे,' असं गर्ग यांनी म्हटलं आहे. 

८९० कोटींच कर्ज

ऑक्टोबर २०१८मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलच्या (एनसीएलटी) मुंबई शाखेनं कंपनीविरोधात आयसीआयसीआय बँकेनं दाखल केलेली याचिका स्वीकारली होती. गीतांजली कंपनीनं ८९० कोटींच कर्ज बॅंकेकडून घेतलं होतं. मात्र हे कर्ज कंपनीला फेडणं कठीण होत असल्याचं स्पष्ट केल्यावर बॅंकेनं ट्रायब्यूनलमध्ये याचिका दाखल केली होती.

पहिली याचिका

पीएनबी बँकेत मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यानंतर सरकारी यंत्रणांनी चौकशी सुरू केल्यावर या प्रकरणी दाखल केलेली ही पहिली याचिका होती. गीतांजली जेम्स या कंपनीकडं बँकांची १२ हजार ५५८ कोटी रुपये थकबाकी आहे. 


हेही वाचा -

क्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

रेल्वे तिकीट दलालांला पकडण्याची जबाबदारी प्रवाशांवर


पुढील बातमी
इतर बातम्या