नीरव मोदीची ५,१०० कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतल्या ४ मालमत्तांचा समावेश

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदी यांच्या देशभरातील मालमत्तावर सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालया(ईडी) ने गुरूवारी दिवसभर छापे टाकले. या कारवाईत 'ईडी'ने आतापर्यंत नीरव मोदीची ५ हजार १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये मुंबईतील ४ मालमत्तांचा समावेश आहे.

काय आरोप?

डायमंड किंग नीरव मोदीने खोटे हमीपत्र सादर करून परदेशातील मित्रांना व्यवसायासाठी हजारो कोटी रुपयांचं कर्ज मिळवून दिलं. डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स अशा दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (एलओयू) मिळवून दिल्याचा मोदीवर आरोप आहे.

गीतांजली जेम्स, जिली इंडिया आणि नक्षत्र, तसंच नीरव मोदी ग्रुप फर्म्स यांच्या वतीने एलओयू (LoU) किंवा एफएलसी (FLC- फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट) च्या आधारे अॅक्सिस, अलाहाबाद आणि युनियन बँकेकडून गैरव्यवहारात सामील खातेदारांना कर्ज देण्यात आलं आलं. यातील एकही व्यवहार हा कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)च्या माध्यमातून झाला नव्हता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पीएनबी बँकेकडून २९ जानेवारीला गुन्हा नोंदवण्यात आला.

कुठे कारवाई?

या प्रकरणी 'ईडी'ने गुरूवारी नीरवच्या देशभरातील ९ मालमत्तांवर छापे टाकले. यामध्ये मुंबईतील कुर्ला प्रीमियर रोडवरील कोहिनूर सिटी कमर्शियल टाॅवर २, काळाला घोडा येथील नीरवचं ज्वेलरी बुटीक, लोअर परळ येथील पेपिन्सुला बिजनेस पार्कमधील कार्यालय आणि ठाण्यातील एका मालमत्तेचा समावेश आहे. त्यासह दिल्ली आणि सूरतमधील मालमत्तावर ईडीने लक्ष केंद्रीत केलं. जप्त करण्यात आलेल्या सामग्रीत प्रामुख्याने ज्वेलरी आणि हिरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हेही वाचा-

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा

घोटाळेबाजांना सोडणार नाही- सुनील मेहता


पुढील बातमी
इतर बातम्या