एटीएम मशीनला स्किमर लावून चोरी करणारा अटकेत

एटीएम मशीनमध्ये स्किमर बसवून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने अशा प्रकारे आणखी किती जणांना लुबाडलं आहे, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

कशी झाली अटक?

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या खात्यातून काही तासांतच पैसे चोरीला जात होते. एका मागोमाग एक अंधेरी पेलिस ठाण्यात तक्रारी नोंद होत होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.

खेरवाडीतून अटक

पोलिसांनी बँकेकडून संबधित एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यामध्ये आरोपी स्किमर मशीनच्या मदतीने पैसे काढायला येणाऱ्या ग्राहकांची माहिती चोरत असल्याचं पोलिसांना दिसून आलं. तपासादरम्यान हा आरोपी वांद्रे खेरवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी त्याला अटक केली.


हेही वाचा-

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

म्हणून 'तो' स्वत:चाच गळा चिरून घ्यायचा...


पुढील बातमी
इतर बातम्या