अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक


अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक
SHARES

मुंबईत अंमली तस्करांच्या मुसक्या आवळण्यास अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर तस्करांनी आता आपले अड्डे बदलण्यास सुरुवात केली आहे. बीपीटी काॅलनीतील ईस्टन फ्री-वे खाली या तस्करांनी आता आपला अड्डा बनवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच एएनसीच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी एका नायजेरिनला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून अडिच लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत केलं आहे.


यांचा मोर्चा विरार, वसईकडे

ऐकीकडे मुंबईत नायजेरियन तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी या नायजेरियन तस्करांना शहरात भाड्याने खोल्या देण्यावर अनेक निर्बंध लादले. त्यामुळेच या नायजेरियन तरुणांनी आपला मोर्चा विरार, वसई, पालघर, नालासोपारासह खारघर येथे वळवला आहे.

अंमली पदार्थ विभागाने आतापर्यंत पकडण्यात आलेले नायजेरियन तस्कर हे खारघरमध्ये वास्तव्यास असल्याचं पुढे आलं आहे. नुकतीच पोलिसांनी ईस्टन फ्री-वे खाली या नायजेरियन टोळीच्या नव्या अड्ड्याच्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ऊचाईना औओविल या ३२ वर्षीय तस्कराला नुकतीच अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी ५० ग्रॅम कोकिन हस्तगत केले आहे.


आझाद मैदान पोलिसांची कारवाई

बाजारात याची किंमत ही अडिच लाख रुपये इतकी आहे. या नायजेरियन तस्करांच्या चौकशीतून तो देखील खारघरच्या कोपर खैरणे परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलिस भाड्याने खोली देणाऱ्यांना फारशी विचारपूस करत नाही. त्यामुळे आश्रय मिळणं सोपं जात असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी एएनसीचे आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा