भांडुपच्या ड्रिम्स माॅलमध्ये चोरी करणाऱ्याला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

भांडुपच्या ड्रिम माॅलमध्ये दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या अाहेत. शुभम सिंग (२३) असं या आरोपीचं नाव आहे. काही एकर जागेमध्ये परसलेल्या या माॅलमध्ये विकासक आणि दुकानदारांमध्ये सध्या पुनर्विकासावरून वाद सुरू आहे. त्यामुळे अर्ध्या अधिक बंद दुकांनाचा फायदा घेत शुभमने रात्रीच्या वेळीस चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

दुकानातून ९५ हजार चोरीला

भांडुपच्या ड्रिम माॅलमध्ये अनिल सावंत यांचं जनरल स्टोअर्सचं दुकान अाहे. २६ मे रोजी सावंत हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. २७ मे रोजी सकाळी सावंत दुकान उघडण्यासाठी आले, त्यावेळी दुकानाचं शटर अर्धवट उघडलेलं तर बाजूलाच तोडलेलं लाॅख त्यांना दिसून अालं. अात प्रवेश केल्यावर दुकानातील सर्व सामान विस्कटलेलं होतं. तिजोरीही अर्धवट उघडलेली दिसली. तिजोरीतील ९५ हजार चोरीला गेले होते. त्यानुसार सावंत यांनी भांडूप पोलिसांना पाचारण केलं.

मुलुंड स्टेशनबाहेरून अारोपीला अटक

पोलिसांनी सावंत यांची रितसर तक्राप नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, एका विश्वसनीय सूत्रांनं सावंत यांच्या दुकानात चोरी करणारी व्यक्ती मुलुंड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शुभमला मुलुंड स्थानकाबाहेरून अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्यांची कबूली दिली. शुभम हा अमित निवास माॅडेल काॅलेजसमोरील, उत्तर भारतीय भवनजवळ चिंचपाडा, कल्याण येथे राहतो. पोलिसांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा -

फेसबुकवरील फ्रेंडशिप पडली महागात!

बांधायच्या होत्या मुंडावळ्या हातात पडल्या बेड्या!

पुढील बातमी
इतर बातम्या