फेसबुकवरील फ्रेंडशिप पडली महागात!


फेसबुकवरील फ्रेंडशिप पडली महागात!
SHARES

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी फ्रेंडशिप करणं साकीनाक्यातील एका नर्सला चांगलंच महाग पडलं अाहे. फेसबुकवरील अनोळखी तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याच्या जाचाला कंटाळून तरुणीनं साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अखेर गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी त्याला अटक केली.


अनवधानाने स्वीकारली फ्रेंट रिक्वेस्ट

साकीनाका इथं राहणारी एक २२ वर्षीय तरुणी कुर्ला परिसरातील डेंटल क्लिनिकमध्ये नोकरी करते. जानेवारी २०१८ मध्ये तिला फेसबुकवर सुरेश वाघमारे (२५) याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. अनवधानाने त्या तरुणीने तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. सुरेश ठाण्याच्या कासारवडवली इथं राहणारा असून तो मूळचा लातूरचा रहिवाशी आहे. मुंबईत एका खासगी कंपनीत सध्या तो काम करतो.


नोकरीला लावण्याचं दिलं अामीष

फेसबुकवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्यानं आपण एका कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला असून रुग्णालयातील अनेक मोठ्या लोकांशी ओळखी असल्याचं तिला सांगितलं. तसंच तरुणीला चांगल्या ठिकाणी नोकरी लावण्याचं आमीषही दाखवलं. रोजच्या बोलण्यातून तरुणीनं मोबाईल नंबर दिल्यावर सुरेश वारंवार फोन करून तिला सतावू लागला. मार्च महिन्यात त्यानं कुर्ला येथील डेंटल क्लिनिक बाहेर बोलावून तिला प्रपोझही केलं.


अश्लिश मॅसेज येऊ लागले

तरुणीनं त्याच्या प्रेमाला नकार दिल्यावर सुरेशचा पारा चांगलाच चढला. तो रात्री-अपरात्री फोन आणि मॅसेज करून तिला त्रास देऊ लागला. या त्रासाला वैतागून तरुणीनं सुरेशला फेसबुक, आणि मोबाईलवर ब्लाॅक केलं. त्यामुळे राग अनावर झालेला सुरेश तिला वेगवेगळ्या नंबरवरू फोन करू लागला. तसंच तरुणीच्या व्हाॅट्स-अॅपवर अश्लिल मॅसेज आणि व्हिडिओ क्लिप पाठवू लागला.


अखेर घेतली पोलिसांकडे धाव

रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीनं १२ मार्च रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा १० चे पोलिस करत होते. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर सुरेश हा अापल्या गावी लातूरला पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत पोलिसांनी सुरेशला लातूरहून अटक करत, त्याचा ताबा साकीनाका पोलिसांना दिला आहे. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली अाहे.


हेही वाचा -

रेल्वेचं तिकिट मिळवण्यासाठी 'तो' वापरायचा मंत्र्यांची बनावट शिफारसपत्रं

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा