रेल्वेचं तिकिट मिळवण्यासाठी 'तो' वापरायचा मंत्र्यांची बनावट शिफारसपत्रं

देवप्रताप उत्तप्रदेशातील लोकसभा, राज्यसभा आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांची बनावट शिफारसपत्र बनवून तिकीट मिळवायचा आणि प्रत्येक तिकीटामागे १२०० ते २४०० रुपये कमवायचा. कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत येणाऱ्या गाड्यांच्या तिकीटांसाठी प्रामुख्याने देवप्रताप लबाडी करायचा. सुट्टीच्या मोसमात गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळावं

रेल्वेचं तिकिट मिळवण्यासाठी 'तो' वापरायचा मंत्र्यांची बनावट शिफारसपत्रं
SHARES

सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांचं तिकीट मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ सुरू असताना दिसून येत आहे. या ट्रेनमधील रिझर्व्हेशन फूल झाल्याने सर्वसामान्यांची तारंबळ उडत असली, तरी आमदार, खासदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष जागा राखीव ठेवण्यात येत असल्याने त्यांची चांगलीच सोय होते. या राखीव जागा त्या-त्या मंत्र्यांच्या शिफारसपत्रांनी त्यांच्या कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तींना दिल्या जातात. याच गोष्टीचा फायदा उचलत मंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांची बनावट शिफारसपत्रं तयार करून तिकीट मिळवणाऱ्या आणि हे तिकीट चढ्या भावात विकणाऱ्या एका भामट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.    


कोण आहे हा आरोपी?

''देवप्रताप चुतुर्भुज सिंह (२९) असं या आरोपीचं नाव आहे. देवप्रताप उत्तप्रदेशातील लोकसभा, राज्यसभा आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांची बनावट शिफारसपत्र बनवून तिकीट मिळवायचा आणि प्रत्येक तिकीटामागे १२०० ते २४०० रुपये कमवायचा. कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत येणाऱ्या गाड्यांच्या तिकीटांसाठी प्रामुख्याने देवप्रताप लबाडी करायचा. 

सुट्टीच्या मोसमात गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळावं यासाठी देवप्रताप चुतुर्भुज सिंह मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारचं कारस्थान रचत असल्याचं चौकशीतून पुढं आल्याची'', माहिती रेल्वे पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी दिली.


'असा' झाला पर्दाफाश

देवप्रताप याने रेल्वेच्या तिकिटासाठी इंटरनेटवरून मध्य रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात एका अधिकाऱ्यांच्या नावे फॅक्सद्वारे शिफारसपत्र पाठवलं. हे पत्र त्याने इंटरनेटवरून डाऊनलोड करून त्यावर फेरफार करून पाठवलं होतं. शिफारसपत्रावर खोटे कार्यालयाचं नंबर आणि नाव टाकून व्हीआयपी कोट्यातून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा बनाव रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.


८ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर

देवप्रताप सिंहने आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव के. पी. बक्षी, उत्तरप्रदेशचे राज्यसभा सदस्य निरज शेखर, उत्तरप्रदेशच्या लोकसभेचे सदस्य रोजेया पाण्डेय, यासह ८ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचं तपासात पुढे आलं आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा दुरुपयोग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा