निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा दुरुपयोग


निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा दुरुपयोग
SHARES

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ बसची ओळख आहे. दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी ‘बेस्ट’चा वापर करतात. प्रवाशांच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत दररोज सुमारे ३ कोटी ७६ लाख रुपये जमा होत असतात. मात्र फुकट्या प्रवाशांमुळे आज बेस्ट बसचा प्रवास तोट्यात आहे. या फुकट्या प्रवाशांच्या यादीत पोलिसांची वर्णी फार पूर्वीच लागली होती. मात्र त्या मागोमाग आता निवृत्त पोलिस अधिकारीही आपल्या ओळखपत्राचा दुरूपयोग करून फुकटच्या प्रवासाचा लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.


जुहूतील प्रकरण

काही महिन्यांपूर्वीच जुहू पोलिस ठाण्यातून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या प्रकाश माळवे यांना बेस्टच्या अधिकाऱ्यांनी विना तिकीट प्रवास करताना पकडलं. त्यावेळी माळवे यांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करत ओळखपत्र दाखवले. मात्र दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर माळवे हे निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं उजेडात आलं. त्यानंतर बेस्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर माळवे यांचं ओळखपत्र जमा करून घेण्यात आलं.

या घटनेची गंभीर दखल घेत सेवा निवृत्तीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी ओळखपत्र सेवा निवृत्तीच्या दिवशीच जमा करून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच यापुढे असा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचं आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा