धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

चांगलं अॅप्लिकेशन आणि सर्वात सुरक्षित म्हणून ओळखला जाणारा अॅपल कंपनीचा फोन हा सर्वांनाच हवा असतो. पण याच अॅपल कंपनीचा डाटा लिक झाल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी अॅपल कंपनीने एका 27 वर्षीय तरुणावर व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला
SHARES

चांगलं अॅप्लिकेशन आणि सर्वात सुरक्षित अशी ओळख असणारा अॅपल कंपनीचा आयफोन सर्वांनाच हवा असतो. पण याच आयफोनचा डाटा लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अॅपल कंपनीने एका २७ वर्षीय तरुणावर व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. रुपेश कांबळे असं या आरोपीचं नाव असून तो विरारला राहणारा आहे.


त्याने असं का केलं?

महिन्याला अवघ्या २० हजार रुपयांच्या मोबदल्यासाठी त्याने हैद्राबाद येथील आपल्या मित्राला हा डेटा पाठवल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे.


कोण आहे रुपेश?

बी २ एक्स सर्व्हिस सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. याठिकाणी अॅपल कंपनीच्या मोबाइल फोनच्या दुरूस्तीचं काम चालतं. या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजावर तक्रारदार स्वाती सावंत मॅनेजर म्हणून काम पहातात. या ठिकाणी आरोपी रुपेश कांबळे १९ सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व्हिस इंजिनीअर म्हणून कामाला होता. रुपेश विरारच्या मनवेलपाडा नाना-नानी पार्क, माऊलीकृपा इमारत क्र. ९ मध्ये रहातो.


या कंपनीतील रुपेशचं काम?

  • सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी आलेले आयफोन वॉरंटी पिरीअडमध्ये आहेत का? याची पडताळणी करणं
  • मोबाईल फोन वॉरंटी पिरीअडमध्ये असतील, तर बंगळूरू येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवणं अन्यथा दुरुस्त करणं
  • नादुरूस्त फोनमधील पार्टस् अॅपल कंपनीकडे पाठवणं
  • नवीन अॅपल फोन आल्यानंतर त्याची पडताळणी करणं
  • आलेलं अॅपल फोन वॉरंटी पिरीअडमध्ये आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तेथे यूझर आयडी आणि पासवर्ड टाकणे 
  • या वेबसाईटवर अॅपल कंपनीची इत्यंभूत गोपनीय माहिती असते. त्यामुळे वेबसाईइट उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा यूझर आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो.


संपूर्ण प्रकार

६ ऑक्टोबर २०१७ रोजी या कंपनीनं रुपेशला कामकाजासाठी अॅपल कंपनीचा लॅपटॉप, यूझर आयडी आणि पासवर्ड दिला होता. त्यावरून रुपेश दिवसाला अंदाजे २० मोबाइल दुरूस्त करायचा. दरम्यान डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुपेश वापरत असलेला आयडी लॉक झाल्याने त्याला कंपनीतील कर्मचारी सुशांतचा आयडी देण्यात आला होता. 

कंपनीने रुपेशच्या आयडीमध्ये केलेल्या ऑपरेशनल चेकिंगमध्ये त्याचा पर्सनल ई-मेल आयडी लॉगइन होता. त्याद्वारे रुपेशने कंपनीच्या वेबसाईटवरून चोरलेल्या माहितीचे स्क्रिन शॉटस् पाठवल्याचं दिसून आलं. रुपेश कांबळेकडे केलेल्या चौकशीत त्याने अॅपल कंपनीची गोपनीय माहीती चोरून ती त्याच्या हैदराबाद येथील मित्र प्रदीप याला पाठवल्याचं कबूल केलं. त्यासाठी प्रदीप त्याला महिना २० हजार रुपये देत होता. 


मॅनेजरने केली तक्रार

याप्रकरणी बी २ एक्स सर्व्हिस सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.च्या मॅनेजर स्वाती सावंत यांच्या तक्रारीवरून व्ही. पी. रोड पोलिसांनी रुपेशवर गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू असल्याचं व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा-

मुंबई हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानात पुन्हा सुरू

किर्ती व्यासच्या मारेकऱ्यांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा