दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष काळजी घेण्यात आली होती. राज्यातील पोलिस दलानं कायदा व सुव्यवस्था टिकवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली. आंदोलकांना आझाद मैदान वगळता शहरात कोठेही आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. मात्र कोरोना व्हायरसमुळे आता आझाद मैदानात ही आंदोलन कऱण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) आणि एनआरसी विरोधात ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गेट वे आॅफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आली. मात्र दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हिंसाचार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी म्हणून गृहमंत्रालयाने आझाद मैदान वगळता शहरात कोठेही आंदोलन करण्यास परवानगी न देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलकांना त्यांचा आवाज उठवण्यासाठी आझाद मैदान हा एकच पर्याय उरला.
हेही वाचाः- Coronavirus Updates: अखेर IPL पुढे ढकलली; १५ एप्रिलपासून सुरू होणार
सध्या मुंबईत अधिवशेन असल्यामुळे आपल्या व्यथा, प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे गाऱ्हाने घेऊन येतात. तर काही जण न्याय मिळावा यासाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसतात. मात्र सध्या देशभऱात कोरोना या संसर्ग जन्य रोगाचे सावट आहे. भारतात ही आता या रोगाचे परिणाम दिसू लागताच. राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणण्यास सुरूवात केली. आझाद मैदान ही नागिरक आंदोलनासाठी मोठ्या संख्येने जमतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आता पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलकांना परवानगी देणे थांबवले आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी ३४ आंदोलन रद्द केलयाची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.