मुंबईतील एका ५७ वर्षीय कोरोनाबाधित पोलिस हवालदाराचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. मृत पोलिस वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात आता कोरोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दल हादरलं आहे.
हेही वाचा -