Advertisement

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढती रूग्णसंख्येमुळे महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन रुम म्हणजेच विलगीकरण म्हणून वापरल्या जाणार आहेत.

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा
SHARES

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढती रूग्णसंख्येमुळे महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन रुम म्हणजेच विलगीकरण म्हणून वापरल्या जाणार आहेत. महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात यासाठी तयारी करण्याबाबतचं पत्र मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षण अधिकार, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक, सर्व अधीक्षक यांना दिलं आहे. 

सर्व क्षेत्रीय उपशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली खाली येणाऱ्या बीएमसी शाळा, बीएमसीच्या प्राथमिक शाळा या क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून द्याव्यात यासाठी शाळांची यादी करण्यास या पत्रात सांगितलं आहे. याशिवाय शाळा मोडकळीस आलेली नाही किंवा दुरुस्तीचे काम सुरु नाही याची खातरजमा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करुन घेण्यास सांगितलं आहे

पत्रात नमूद केलं आहे की, विलगीकरण कक्षासाठी देण्यात येणाऱ्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पंखे, पाणी इतर सोयीसुविधा नसतील तर तातडीने त्या दिल्या जाव्यात. याशिवाय उपशिक्षण अधिकारी, अधीक्षक यांनी या शाळांमध्ये शाळा प्रतिनिधी ठेवण्यासाठी नियोजन करावं, जेणेकरुन प्रत्येक शाळेत हे शाळा प्रतिनिधी या ठिकाणी काम करतील. काही शिक्षक, मुख्याध्यापक गावी असल्याने त्यांच्या कामाबद्दलचे नियोजन करुन, त्यांना कामावर येण्यासाठी आवश्यकतेनुसार लेखी आदेश द्यावेत.


हेही वाचा -  

वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण






Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा