Advertisement

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येनं ४ हजारांचा आकडा पार केला आहे.

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येनं ४ हजारांचा आकडा पार केला आहे. गुरूवारी संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनाच्या ४७८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांची ४ हजार २३२ इतकी झाली आहे. तसंच, मागील २४ तासांत मुंबईत कोरोनामुळं ८ रुग्णांचा बळी गेला आहे.

मुंबईत एकूण मृतांचा आकडा १६८ इतका झाला आहे. सकारात्मक बाब म्हणजे, मुंबईत गुरूवारी आणखी ४८ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ४७३ जणांनी करोनाला हरवण्यात यश मिळवलं आहे. मुंबईत गुरुवारी, दिवसभरात १८१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २० आणि २१ एप्रिल रोजी विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या चाचण्यांचे जे अहवाल आले आहेत त्यात २९७ रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं एकूण ४७८ नवीन रुग्णांची भर मुंबईच्या एकूण आकडेवारीत पडली आहे.

मुंबईतील आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार २३२ इतकी झाली असून, प्रत्यक्षात त्यातील ३ हजार ५९३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना सदृष्य लक्षणं असलेले २७८ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ७ हजार ६०६ इतकी झाली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा