Advertisement

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक दिलासादायक बातमी आहे.  मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण आढळला नाही. त्यामुळं ही ठिकाणं आता कंटेन्मेंट यादीतून वगळण्यात आली असून येथील अतिरिक्त निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

कोरोनाचा फैलाव होण्याच्या शक्यतेमुळं मुंबईत ९३० ठिकाणं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केली आहेत. या भागांत लॉकडाऊनपेक्षाही कठोर निर्बंध लादण्यात आले होते. १४ दिवसांनंतर आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध उठवण्यात आले. एकही नवीन रुग्ण न आढल्याने २२ एप्रिलपर्यंत १८९ ठिकाणं कंटेन्मेंट झोनच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तरीही सध्या मुंबईत ३०० हून अधिक ठिकाणं कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत.

कोरोना रुग्ण असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो. त्यानंतर १४ दिवस महापालिकेकडून येथील परिस्थितीची पाहणी केली जाते. या काळात कुठलाही नवा रुग्ण न आढळल्यास हे ठिकाण कंटेन्मेंट झोनच्या यादीतून वगळले जाते. सध्या निर्बंधमुक्त झालेल्या ठिकाणांमध्ये मलबार हिलमधील काही इमारती, अरब लेन, ग्राण्ट रोड, फॉर्जेट स्ट्रीट, अँटॉप हिल-वडाळा, पवईतील हिरानंदानी बोरिवलीतील आयसी कॉलनी, परळमधील काही चाळी, विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि लालबागचा समावेश आहे.



हेही वाचा -  

वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा