चॅप्टर केसच्या चौकशीला अर्णब गोस्वामी दुसऱ्यांदा गैरहजर

रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावून शनिवारी हजर राहण्यास सांगितले होते. पण पुन्हा गोस्वीमा यांनी सलग दुस-यांना या प्रक्रियेला येणे टाळले. दरम्यान बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी रिपब्लिकचे वार्ताहर व अँकर विरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी त्यांनी  ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याला शनिवारी सकाळी भेट दिली.

हेही वाचाः- शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भादंवि कलम १५३, १५३(अ),१५३(ब), २९५(अ),२९८, ५००, ५०५(२),५०६, १२०(ब) ५०५(२), ५०६ अंतर्गत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरमी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र का घेऊन नये, यासाठी गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरला सायंकाळी चारवाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पण गोस्वामी यांनी या नोटीसला उत्तर दिले व या प्रक्रियेला गैर हजेरी दर्शवली. त्यानंतर गोस्वामी यांना पुन्हा शनिवारी ला बोलवण्यात आले होते.त्याला गोस्वामी यांच्या वकिलांनी गोस्वामी येऊ शकत नसल्याचे सांगितले.

हेही वाचाः- सुशांत सिंग राजपूत प्रकरणः पुण्यातून चरससह टॅक्सी चालकाला अटक

 त्यानुसार पुढील सुनावणी आता ७ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. दरम्यान, उपसंपादक शावन सेन व  कार्यकारी संपादन निरंजन नारायणस्वामी यांचे मनोबल वाढवण्यासाठी गोस्वामी यांनी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्यासोबत गेले. पोलिस खाते व पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर नुकताच ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

पुढील बातमी
इतर बातम्या