सुशांत सिंग राजपूत प्रकरणः पुण्यातून चरससह टॅक्सी चालकाला अटक

या प्रकरणात सेलिब्रिटींच्या चौकशीनंतर एका अभिनेत्याच्या प्रेयसीला एनसीबीने नुकतीच अटक केली. त्यानंतर तिच्या गॅब्रिल्लाच्या भावालाही अटक झाली.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणः पुण्यातून चरससह टॅक्सी चालकाला अटक
SHARES

सुशांत सिंग राजपुत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर एनसीबीने तस्करांच्या मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली. या प्रकरणात सेलिब्रिटींच्या चौकशीनंतर एका अभिनेत्याच्या प्रेयसीला एनसीबीने नुकतीच अटक केली.  त्यानंतर तिच्या गॅब्रिल्लाच्या भावालाही अटक झाली. या दोघांना ड्रग्स पुरवणा-या अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. साहिल मझार अली(३४) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे पश्चिम येथील रिक्लेमेशन परिसरातील रहिवासी आहे.

हेही वाचाः- मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी

पुण्याच्या दापोडी परिसरातील जयभीम नगर परिसरात राहणारा अली टॅक्सी चालक आहे. एनसीबीने त्याच्या घराव छापा टाकला असता तेथे ७.२ ग्रॅम चरस सापडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता त्याने अभिनेत अर्जून रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ आरोपीने अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्स याला ड्रग्स पुरवल्याचे मान्य केले आहे. डेमेट्रीअॅडेट्सला नुकतीच एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून ०.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवारी आरोपीच्या खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. त्या ठिकाणी अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली आहे. आरोपीला तेथील एक रिक्षा चालक अंमली पदार्थ पुरवत होता. तो साहिल अलीच होता.  डेमेट्रीअॅडेट्स त्याशिवाय याप्रकरणी अटक अनुज केशवानी व ड्वेन यांच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे. याशिवाय  डेमेट्रीअॅडेट्स याप्रकरणातील आरोपी कैझानलाही ओळखत होता. त्याने   डेमेट्रीअॅडेट्स हशीश व आईसचा पुरवठा केला होता.

हेही वाचाः- भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामराम

डेमेट्रीअॅडेट्सचा फोटो आरोपीला दाखवला असता त्यान आरोपीला पेडलर म्हणून ओळखले आहे. त्यामुळे डेमेट्रीअॅडेट्स हा ड्रग्स वितरणाशी संबंधीत असल्याचा संशयी एनसीबीला आहे. आरोपी अलीने यापूर्वी एलएसटी व एमडीएमएही खरेदी केले असून अनेक ड्रग्स पेडलरला तो ओळखतो. हे सर्व पेडलर एकमेकांशी संबंधीत आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा