Advertisement

भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामराम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गीता जैन यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामराम
SHARES

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा आज अखेर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गीता जैन यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीच प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आज मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. मिरा-भाईंदरसाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने शेवटी त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजयी झाल्या.

हेही वाचाः- खासगी रुग्णालयात २३६० रुपयांना मिळणार रेमडेसिवीर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा