Advertisement

मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी

एका वाहतूक पोलिसाला महिलेनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील काळबादेवी परिसरात घडली आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी
SHARES

एका वाहतूक पोलिसाला महिलेनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील काळबादेवी परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानं कारवाई केलेल्या पोलिसाला महिलेने बेदम मारहाण केली.

वाहतूक पोलिसानं आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा सदर महिलेनं केला. या प्रकरणी बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.  याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. 

मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतूक पोलिसाने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या व्हिडीओत महिला  आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे.  त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत पोलिसाची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले.

या व्हिडीओत सदर महिला त्या हवालदाराला शिवीगाळ करताना दिसत आहे. याप्रकरणी L. T. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  करण्यात आला आहे. या आरोपींवर कलम 571/2020 IPC 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा