Advertisement

शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडूच शकत नाहीत. कारण शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिला आहे, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईवरून राजकारण करणाऱ्यांना थेट इशाराच दिला. दादर येथील सावरकर स्मारक इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray spoke on politics over mumbai in shiv sena dussehra rally speech)

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष होतं. आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि हिंदुत्व आणि बाॅलिवूडवरून राजकारण करणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन पुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. विरोधक सरकार पडण्याची तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा! असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडू शकतच नाहीत. कारण शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिला आहे, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही. जो काही कारभार आम्ही करत आहोत, तो तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहोत.

काय केलं शिवसेनेनं? मराठी माणसाला वडापाव दिला? हो दिला, भीक मागून खायचं नाही, जे काय खाशील ते मेहनतीने आणि हक्काने खा, हा त्यातील संदेश होता. 

पण भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात, निदान त्या मातीशी तरी ईमान ठेवा ना, मित्रपक्षाशी ठेऊ नका. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर फटाके नका वाजवू पण निदान खोटं तरी बोलू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement