पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला खंडणीप्रकरणी अटक

गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. भारती चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. भारती चौधरी यांनी  टेम्पो चालकाकडून ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गुप्ता नावाचा टेम्पो चालक पान मसाला असलेले बॉक्स टेम्पोतून घेऊन भेंडी बाजारात जात होता. यावेळी चौधरी त्यांना त्याचा टेम्पो गोदरेज कंपनी येथे अडवला. चौधरी यांनी टेम्पो चालकाला आपण पोलीस असल्याचं सांगितलं. यावेळी चौधरी यांच्याबरोबर आणखी एक तरूण होता. दोघांनी टेम्पो चालकाला धमकावले. त्यांनी त्याच्याकडे ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, टेम्पो चालकाला चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या तरूणाचा संशय आला. 

 टेम्पो चालकाने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. त्याने पोलिसांना त्याठिकाणी बोलावून आणले. त्यानंतर पोलिसांनी चौधरी आणि त्या तरूणाला ताब्यात घेतलं. चौकशीत चौधरी यांनी खंडणी मागवल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांना  जामीन मिळाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  दर सोमवारी त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली.


हेही वाचा -

शीर नसलेल्या मृतदेहाचे पाय सापडले

नौदल सैनिकांना सोशल मिडियावर बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या