नौदल सैनिकांना सोशल मिडियावर बंदी

सोशल मिडियाच्या माध्यमातून हे हेर पाकिस्तानी हॅण्डलरला माहिती पोहचवत असल्याचे पुढे आल्यानंतर भारतीय नौदलाने सैनिकांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नौदल सैनिकांना सोशल मिडियावर बंदी
SHARES

मुंबईतील नौदल पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या डॉकयार्डमध्ये हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा नौदल गुप्तहेर खात्याने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे हेर पाकिस्तानी हॅण्डलरला माहिती पोहचवत असल्याचे पुढे आल्यानंतर भारतीय नौदलाने सैनिकांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचाः- पाकिस्तानच्या गुप्तहेरास मुंबईच्या नौदल डाॅकयार्डमधून अटक

जम्मू-कश्मीर केंद्र शासित प्रदेश जाहिर केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. युद्धजन्य परिस्थिती पाहता सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमिवर नौदलातील गुप्तहेर पथकाला नौदलात पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नौदलाने विशाखापट्टणम तळावर शोध घेतला असता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन नाविक नौदलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील त्यांच्या हॅण्डलरला माहिती देत होते.

हेही वाचाः- New Year मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी

त्या पार्श्वभूमिवर नौदलाने जारी करण्यात आलेल्या आदेशात नौदलातील सैनिकांना सोशल मिडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फेसबुक, व्हाँट्स अँप सारख्या मेसेजिंग अँप,  नेवर्किंग व ब्लाँकिंग अँप, कंटेट शेअरिंग, होस्टिंग आणि ई-काँमर्स संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मिडियावरील हँनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकण्यापासून नौसैनिकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तैनातीच्या ठिकाणांवरील संवेदनशील माहिती शत्रूच्या हातात पडू नये. यासाठी नौसैनिकांच्या स्मार्टफोन वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा