New year मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी

नागरिकांची उत्सुक्ता लक्षात घेता राज्यसरकारने नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्रभर करण्यास परवानगी दिली आहे.

New year मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी
SHARES

चाकरमान्यांसह सर्वांनीच २०१९ ला जल्लोषात निरोप देतानाच नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. नागरिकांची उत्सुक्ता लक्षात घेता राज्यसरकारने  नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्रभर करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री आणि करमणूक कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचाः- New Year: ३१ डिसेंबर निमित्ताने वाहतूक मार्गात बदल

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. हॉटेल्स, पब्स, क्‍लबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. नववर्ष स्वागताच्या या आनंदात कोणतेही विरजन पडू नये, यासाठी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनने हॉटेल्सची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने नागरिकांच्या आनंदात विरजन पडू नये या अनुशंगाने ही वेळ वाढवून दिल्याचे कळते. दरवर्षी रात्री दीड वाजेपर्यंत या कार्यक्रमांना राज्यसरकारकडून परवानगी दिली जाते. वाढवून दिलेली परवागनी लक्षात घेता पोलिसांनी ही कोणतीही अनुच्चित घटना घडू नये. त्याअनुशंगाने मोठा फौज फाटा मुंबईच्या रस्त्यांवर तैनात केला आहे. वाहतूक विभागाने ही १०० महत्वांच्या रस्त्यांवर नाकाबंदी ठेवली जाणार आहे. पोलिसांच्या सुट्या ही रद्द केल्या आहेत. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवत ४० हजार पोलिस सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचाः New Year: नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसही सज्ज

मद्य विक्रीबाबत परवानाधारकांना मद्यविक्री करण्याची परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्यास तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास अथवा नाका-बंदी पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना मद्यप्राशन केलेले कोणी आढळल्यास त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून सांगण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा