पाकिस्तानच्या गुप्तहेरास मुंबईच्या नौदल डाॅकयार्डमधून अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन नाविक नौदलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील त्यांच्या हॅण्डलरला माहिती देत होते.

पाकिस्तानच्या गुप्तहेरास मुंबईच्या नौदल डाॅकयार्डमधून अटक
SHARES

मुंबईतील नौदल पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या डॉकयार्डमध्ये हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा नौदल गुप्तहेर खात्याने पर्दाफाश केला आहे. यातील दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना मुंबईच्या नौदल डाँकयार्ड येथून अटक केली आहे. हे सर्व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे हेर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नौदलाने विशाखापट्टणम तळावर शोध मोहिम राबवली होती. त्यामध्ये सात नाविक पाकिस्तानी हेर असल्याचे समोर आले. त्यातील दोन हेर हे  मुंबईतील नौदल गोदीत व कारवार येथील 'आयएनएस कदंबा' या नाविक तळावर कार्यरत असल्याने निदर्शनास आल्यानंतर  दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे

जम्मू-कश्मीर केंद्र शासित प्रदेश जाहिर केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. युद्धजन्य परिस्थिती पाहता सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमिवर नौदलातील गुप्तहेर पथकाला  नौदलात पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नौदलाने विशाखापट्टणम तळावर शोध घेतला असता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन नाविक नौदलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील त्यांच्या हॅण्डलरला माहिती देत होते.

हेही वाचाः- अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची कारवाई, 'इतक्या' हातगाड्या तोडल्या

अटक करण्यात आलेले हे सर्व सात नाविक २२ ते २४ वर्षाचे असून  अलिकडेच ते नौदलात भरती झाले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे नौदलात दाखल झाले आहेत. या कारवाईत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो हवालामार्फत या सात जणांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. नौदलाने शुक्रवारी रात्री ही मोहीम राबवली. त्यानंतर शनिवारी ही मोहीम राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली. आता या सर्व सात जणांना एनआयएची १४ दिवसांची न्यायिक कोठडी आंध्रप्रदेशातील न्यायालयाने सुनावली आहे. मुंबईतील नौदल अधिकाऱ्यांनुसार, एनआयएच आता यापुढील सर्व तपास करत असून त्याचा अहवाल ते थेट संरक्षण मंत्रालय व गृह मंत्रालयाला देतील. नौदलाने या कारवाईला 'ऑपरेशन डॉलफिन नोज' असे नाव दिले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा