शीर नसलेल्या मृतदेहाचे पाय सापडले

पोलिसांना मागील आठवड्यात घाटकोपर येथे शीर आणि पायाचा खालील भाग नसलेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या पायाचा भाग आता पोलिसांना सापडला आहे.

शीर नसलेल्या मृतदेहाचे पाय सापडले
SHARES

पोलिसांना मागील आठवड्यात घाटकोपर येथे शीर आणि पायाचा खालील भाग नसलेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या पायाचा भाग आता पोलिसांना सापडला आहे. मृतदेह जेथे मिळाला होता तिथून जवळच पायाचा खालील भाग सापडला. मृतदेहाचं शीर मात्र अद्याप पोलिसांना सापडलेलं नाही. 

३१ डिसेंबरला पोलिसांना घाटकोपरमध्ये एका गोणीत शीर आणि पायाचा भाग नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. घाटकोपर पोलिस स्थानकाच्या हद्दीत विद्याविहारमध्ये किरोळ रोडवरील एसटी वर्क शाॅपच्या समोरील नेव्ही गेटच्या बाजूला असलेल्या गटारात हा मृतदेह सापडला.  पोलिसांनी सापडलेले पाय शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे पाय त्याच मृतदेहाचे आहेत का याची तपासणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत तुकडे केलेले मृतदेह सापडण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी एका तरूण आणि तरूणीची हत्या करण्यात आली होती. त्यांचे मृतदेहही तुकडे करून फेकून देण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 


हेही वाचा -

New Year: नववर्षाच्या रात्री 'इतक्या' मद्यपी चालकांवर कारवाई

विजय माल्ल्याला मोठा झटका, मालमत्ता जप्त होणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा