New Year: नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसही सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे. हॉटेल, रेस्तरॉ व ठिकठिकाणी थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत या पार्ट्या सुरू राहणार आहेत. तसंच राज्य सरकारनंही बार व हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोणतीही घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईत ३१ डिसेंबरला सुमारे ४० हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलीस अधिकारीही गस्तीवर असणार आहेत.

सीसीटीव्हीची नजर

नववर्ष स्वागताच्या बंदोबस्तात स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बरोबरीला मुंबईतील विविध भागात सशस्त्र दल, राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस. विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि होमगार्ड यांच्यामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यामातूनही विविध ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे.

विशेष पथकं

काही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार असून महिलांसोबत छेडछाडीच्या घटना घडू नयेत यासाठी विशेष पथकं साध्या वेषात आणि वर्दीत नेमण्यात आली आहेत. तसंच, समुद्रकिनारी दुर्घटना घडू नये यासाठी बोटींद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून हॉटेल आणि लॉजचीही तपासणी केली जाणार आहे.


हेही वाचा -

31st Party: ‘थर्टी फस्ट’व नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज!

नव्यावर्षात 'या' इमारतींच्या बांधकामाला होणार सुरूवात


पुढील बातमी
इतर बातम्या