Advertisement

31st party: ‘थर्टी फस्ट’व नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज!

मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

31st party: ‘थर्टी फस्ट’व नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज!
SHARES

वर्षाच्या अखेरचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर म्हणजेच 'थर्टी फर्स्ट'. थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेल, रेस्टॉरंट व बार, समुद्रावर मोठ्या प्रमाणात मुंबईकर गर्दी करतात. यंदाही याठिकाणी मुंबईकरांना थर्टी फर्स्ट पार्टी साजरी करता यावी यासाठी तयारी करण्यात आली आहे. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु, जागोजागी होणाऱ्या पार्ट्या, रेस्टॉरंट यांमधील आयोजनं यामुळं गर्दी कमी होण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

तळीरामांना दिलासा

राज्य सरकारनं यंदा तळीरामांना दिलासा दिला आहे. पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं यंदा नववर्षाचं स्वागत जोरात होणार आहे. तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये नावाजलेले गायक-गायिकांचे संगीत कार्यक्रम तसंच, डीजेच्या तालावरील पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं तिकीट साधारण २ हजार रुपयांपासून सुरू होते.

नववर्षाचं स्वागत

जोडप्यांसाठी ३ हजार रुपयांपासून तिकिटं आहेत. त्यामध्ये मनसोक्त डान्स, मद्य व स्टार्टर आदींचा समावेश आहे. मोठी हॉटेलं नववर्षाचं स्वागत ग्राहकांसह करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु लहान रेस्टॉरंटमध्ये काहीसा कमी उत्साह असल्याचे दिसून येते. मुंबई व उपनगरांतील मॉलदेखील नववर्ष स्वागतासाठी सज्ज आहेत. काही मॉल आज, मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. काही मॉल्समध्ये व्यवस्थापनाकडून विशेष खेळ व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा