ठाण्यात बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • क्राइम

ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे रस्त्यावरुन जात असलेल्या २ महिलांना बसने जोरदार धडक दिली. या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सोमवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नेमकं काय झालं ?

प्रिती नागेश क्रिष्णमूर्ती नायडू (४६) आणि प्रमीता मलिक या दोघी हिरानंदानी इस्टेट येथे राहत असून  सोमवारी रात्री कामानिमित्त त्या घराबाहेर पडल्या. परिसरातील बस डेपोजवळून जात असताना बस क्रमांक २७०८ ने त्यांना जोरात धडक दिली.  धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.  नायडू यांना लगेचच ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. जावळे यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.  तर मलिक यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं अाहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.


हेही वाचा -

उबर कॅबमध्ये महिला पत्रकाराला मारहाण

खारघरमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू


 

पुढील बातमी
इतर बातम्या