उबर कॅबमध्ये महिला पत्रकाराला मारहाण


उबर कॅबमध्ये महिला पत्रकाराला मारहाण
SHARES

मुंबईत उबर कॅबमधून जात असताना एका महिलेशी झालेल्या भांडणात एक महिला पत्रकार जखमी झाल्याची घटना घडली. उसनोता पॉल असं या महिला पत्रकारचं नाव असून उबर कॅबमध्ये बसलेल्या महिलेसोबत तिच भांडणं झालं. या भांडणात दुसऱ्या महिलेनं पत्रकार उसनोता यांचे केस ओडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी उसनोता यांनी लोअर परेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना उसनोता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे.



  


मध्यस्थी केल्याने वाद

उबर कॅबमध्ये उसनोता यांच्याबरोबर एक महिला बसली होती. या महिलेला घरी जायचं होतं. तिनं लवकर घरी पोहोचण्यासाठी अधिक पैसे दिले होते. मात्र, या महिलेला अगोदर घरी न सोडता सगळ्यात शेवटी घरी सोडणार असल्यामुळं ती उबर चालकावर सतत ओरडत होती. यावेळी महिला पत्रकार उसनोता यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राग अालेल्या या महिलेनं उसनोता यांचे केस ओडले आणि त्यांना मारहाण केली. तसंच त्यांना शिवीगाळ केली.  मारहाणीत उसनोता यांच्या हातातून रक्त येत होतं.



हेही वाचा -

खारघरमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

'पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा'




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा