खारघरमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू


SHARE

रविवारी सुट्टी असल्याने नवी मुंबईतील खारघर परिसरात भिजण्यासाठी गेलेल्या ३ तरूणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार घडली. यापैकी २ जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं असून एकाचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.

फैजन नसर सिद्दकी (१८), रेहान कमर सिद्धकी (१८) आणि आबिद सिद्धकी (३५) अशी तिघांची नावे आहेत.


कशी घडली दुर्घटना?

नवी मुंबईतील खारघर येथील नयनरम्य परिसर आणि धबधबे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. त्यानुसार २४ जून रोजी ३ तरूण पावसात भिजण्यासाठी सेक्टर ३५ खारघर- तळोजा येथील तलावाजवळ गेले होते.

सायंकाळी ६ च्या दरम्यान तळोजा कारागृहाजवळील तलावाजवळ हे तिघेही बसले असताना डोंगरावरून आलेल्या वेगवान पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून तलावात गेले. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला.अग्निशामक दलाने घटनास्थळी शोध घेतल्यावर २ जणांचा मृतदेह हाती लागला. तर तिसऱ्याचा शोध अद्यापही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ खारघर पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.हेही वाचा-

'पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा पोलीस अधिक्षकांवर कारवाई करा'

कार्ड क्लोनिंगप्रकरणी आणखी एका सराईताला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या