कार्ड क्लोनिंगप्रकरणी आणखी एका सराईताला अटक

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटणाऱ्या टोळीतील अाणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली. प्रताप राय (४५) असं या आरोपीचं नाव आहे.

कार्ड क्लोनिंगप्रकरणी आणखी एका सराईताला अटक
SHARES

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटणाऱ्या टोळीतील अाणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली. प्रताप राय (४५) असं या आरोपीचं नाव आहे. प्रताप या गुन्ह्यातील सराईत आरोपी असून त्याच्यावर या पूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.


कुणाला अटक?

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती दुकानदारांना हाताशी धरून चोरणाऱ्या टोळीचा गुरूवारी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी जुबेर सय्यद (३०), हसन शेख (४०), फईम शेख (३०), अबू बोकर (४५), मुकेश शर्मा (४५) यांना अटक केली होती. या टोळीकडून ५१ स्वाईप मशिन, दोन लॅपटाॅप, ६५ बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कार्ड बनवण्यासाठी लागणारे कार्ड रिडर आणि शेकडो चेकबूक हस्तगत करण्यात आले आहेत.


'अशी' करायचे फसवणूक

या फसवणुकीत सहभाग असलेल्या इतर आरोपींची आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या फसवणुकीत दुकानातून मशिन आणून देण्याचं काम प्रताप राय करायचा. अनेकदा इतर राज्यातलं मशिन ही टोळी कुरिअरने मागवायचे. कार्ड स्वाइप झाल्यानंतर रातोरात्र ती मशिन पुन्हा कुरिअरने परत पाठवायचे.

प्रताप मूळचा नालासोपारा येथील रहिवासी असून त्याचा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. या पूर्वीही त्याला सायबर पोलिसांनी २०१५ मध्ये अशाच गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींची नावे पुढे आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


'असं' शिकला कार्ड क्लोनिंग

यातील जुबेर हा बंगळुरूचा राहणारा आहे. जुबेर बारावी शिकला असला. तरी त्याला इंटरनेटचं चांगलंच ज्ञान होतं. बंगळुरूमध्ये आपल्या इंजिनिअर मित्रांकडून त्याला कार्ड क्लोनिंगची माहिती मिळाली होती. या प्रकारात पोलिस आरोपींना कशा पद्धतीने पकडतात याचा त्याने चांगला अभ्यास केला होता. त्यातूनच त्याने परदेशी नागरिक आणि बँकांची बंद होण्याची वेळ निवडली होती.

चोरीतील सर्व पैसे आरोपी वाटून घेत असल्याचं पुढं आलं आहे. त्यानुसार प्राॅपर्टी सेलचे अधिकारी अधिक तपास करत असून आतापर्यंत अटक केल्या आरोपींंना न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाड

रेल्वेची कॅश लुटणारी टोळी गजाआड



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा