रेल्वेची कॅश लुटणारी टोळी गजाआड

मुंबईच्या मानखुर्द परिसरात १३ जूनला रेल्वेच्या कॅश व्हॅनमधून १६ लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

रेल्वेची कॅश लुटणारी टोळी गजाआड
SHARES

मुंबईच्या मानखुर्द परिसरात १३ जूनला रेल्वेच्या कॅश व्हॅनमधून १६ लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या लुटीप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून अद्याप ८ आरोपी फरार आहेत. चोरी करण्यात आलेल्या रकमेपैकी ८२ हजार रुपये आणि चोरीसाठी वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. पहलवान चिराग मोहम्मद शेख, विजय लोहट, डेव्हिड लाॅरेन्स, जगदीश सुवर्णा आणि संतोष राजपूत अशी आरोपींची नावे आहेत.


कशी केली लूट?

मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर तिकिटातून मिळालेले पैसे जमा करण्याचं काम सिक्युरिटी ट्रान्स या कंपनीला देण्यात आलं आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅश व्हॅनची आरोपींना माहिती होती. त्या माहितीनुसार आरोपींनी १३ जूनला मानखुर्द इथं एक कॅश व्हॅन लुटली. या लुटीनंतर पोलिसांनी ८ पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली.


'असं'घेतलं ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता. त्यामध्ये एक संशयीत रिक्षाचालक दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या पूर्वीही त्यांनी कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते अपयशी ठरले.

रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.



हेही वाचा-

विनयभंग करणारा आरपीएफ जवान निलंबित

दारू पिऊन मारझोड करणाऱ्या पतीलाच संपवलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा