SHARE

कल्याण रेल्वे स्थानकावर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ जवानानेच एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.  हा सर्व प्रकार एका दुसऱ्या प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. संबधित महिलेने आजूबाजूच्या प्रवाशांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर नागरिकांनी त्या सुरक्षारक्षकाला चोप देत त्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी त्या जवानाला निलंबित केलं आहे. राजेश जहांगीर असं या विनयभंग करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.


झोपेचं सोंग करत महिलेला स्पर्श

कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर १ ८ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या कुटुंबियांसोबत लोकलची वाट पहात बसली होती. त्यावेळी आरपीएफ जवान असलेल्या राजेश हा तिच्या शेजारी बसला होता. महिला बोलण्यात मग्न असल्याचं पाहून राजेश झोपेचं सोंग करत महिलेला स्पर्श करत होता. पीडित महिलेने दोन ते तीन वेळा राजेशकडे दुर्लक्ष केल्यानंतर एका क्षणाला तिने त्याला हटकलं.

हा सर्व प्रकार एका दुसऱ्या प्रवाशाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला होता. महिलेने राजेशला हटकल्यानंतर आजू बाजूच्या प्रवाशांनी राजेशला चोप देत वरिष्ठांकडे उभं केलं. त्यावेळी आपण कामावरून सुटल्यानंतर रेल्वेची वाट पहात असताना डोळा लागल्यामुळे हा प्रकार नकळत घडल्याचं राजेशने वरिष्ठांना सांगितलं.


आणि व्हिडिओ व्हायरल

मात्र कालांतराने हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर राजेशची चूक निदर्शनास येताच वरिष्ठांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.हेही वाचा -

'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाड

'तिने' ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं, ९ जणांना उडवलंसंबंधित विषय
ताज्या बातम्या