लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला बंगळूरमधून ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमीष दाखवून महिलेशी शारिरीक संबध ठेवून कालांतराने तिला लग्नाला नकार देणाऱ्या आरोपींविरोधात महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली होती.  आरोपी चपळ असल्यामुळेच पोलिसांना त्याला पकडण्यासाठी चक्क वेषांतर केले. पोलिसांनी डिल्हवरी बाॅयचा पोशाख करत त्याच्या मुस्क्या आवळल्या, या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी

मुंबईच्या अंधेरी परिसरात हेल्थ क्लब मध्ये महिलेची मोहम्मद शौकत या आरोपी तरूणाशी ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. पुढे लग्नाचे आमीष दाखवून शौकतने मुलीशी शारिरीक संबध ठेवले. कालांतराने मुलीने शौकतजवळ लग्नासाठी तगादा लावला असता. तो तिला टाळू लागला. लग्न करण्यासाठी शौकतने मुलीच्या कुटुंबियांजवळ पाच लाख रुपयांची मागणी केली. ती मागणी देखील मुलीच्या कुटुंबियांनी पूर्ण केली. मात्र पैसे घेऊन शौकत बंगळूरूला पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने शौकत विरोधात जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.  

हेही वाचाः-  बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

मुंबई पोलिसांनी मोहम्मद शौकतच्या मोबाइलवरून त्याची बंगळूरू येथील माहिती मिळवली. दरम्यान बंगळूरूमध्ये मोहम्मद शौकत हा ऑनलाईन फूड ऑर्डर करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र शौकतला पकडणं हे मुश्किल होतं कारण शौकत हा फुटबाँल प्लेअर असून तो पळण्यात माहिर आहे. त्यामुळे पोलिसांना कोणतिचं रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे पोलिसांनी डिलिव्हरी बॉय बनून घरात प्रवेश मिळवला आणि शौकतच्या मुसक्या आवळल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या