किकी चॅलेंज करणाऱ्या तिघांना अटक

रेलवे पोलिस बल (आरपीएफ) ने ४ सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानकावर किकी चॅलेंज करणाऱ्या तिघा तरूणांना अटक केली आहे. हे तिघेही धारावीत राहणारे आहेत. सूरत गौतम (२३), अब्दुल युसूफ (२२) आणि कन्हैया कुमार (२३) अशी तिघांची नावे आहेत. आरपीएफ अधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१८ यु ट्यूबवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ पाहून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

'आरपीएफ'ला दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ २९ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता शूट करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ यु ट्यूबवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील बराच व्हायरल झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील अधिकारी डी. व्ही. सिंग यांनी सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघून त्याची माहिती आरपीएफला दिली होती. या तिघांनी पैसे कमावण्यासाठी हा उद्योग केल्याचं आरपीएफने सांगितलं.


हेही वाचा-

पुण्याच्या इंजिनिअरिंगच्या मुलीवर मुंबईत बलात्कार

फोर्टमध्ये ७५ वर्षीय वृद्धाची हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या